Sunday 12 July 2015

मी एक एकटा ....

आकाशात सूर्य तळपतो एकटा
नभी फिरतसे चंद्र एकटा
ही अवनीही असे एकटी
तीवर जन्मा आलो मी एकटा
मी एक एकटा.... मी एक एकटा...

नाही मिळाले सुख कधीही
ना प्रेमाची मीळाली वाणी
येता डोळ्या मध्ये पाणी
पुसायला नाही कोणी
एकांत शोधण्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

ना मिळाले प्रेम कुणाचे 
ना लावला जीव कुणी
सदैव दुर्लक्षितच राहिलो
असूनही मी इतका गुणी
प्रेम शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

वाटा अडचणींच्या होत्या
परि मार्ग कधी ना मिळाला
पण प्रयत्न करताना तरीही
पडलो, हरलो....
मी एक एकटा.... मी एक एकटा...

हसतो निखळ आनंदाने
तरी जीव दुःखाने जळत असतो
वेडे मन कुणाचे नाही भेटले
जाणून घेण्या दुःख जीवाचे
अश्या वेड्या मना शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

घास वात्सल्याचा प्रेमाणे भरवावा
हात केसातूनी माझ्या फीरवावा
पण या शापित जीवाला कधीही
नाही लाभले असे जीवन सुखी
अश्या जीवा शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

संसार सुखाचा करण्यासाठी
डाव स्वप्नांचा मांडला मांडला मी
अन् डाव मोडला अर्ध्यावरती
राख झाली सा-या स्वप्नांची
पुन्हा स्वप्ने पाहन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

तेव्हा ही मी एकटाच होतो
आताही एकटाच मी
उद्याही मी एकटाच राहिन
जातानाही असेन एकटाच मी...

मला अजूनही कळत नाही
माझे काय चुकले आणि काय चुकते आहे
शोधन्या ती चुक निघालो....
मी एक एकटा.... मी एक एकटा... 


*** लिंगूराम शापित 

Saturday 22 November 2014

माझी मैत्रीण...

एक माझी मैत्रीण आहे साधी भोळी अल्लड,
रोज तीची होत असते काही न काही गडबड...

धावपळ खटपट दगदग तीची सारखीच चालू असते,
तिच्या मनाची तळमळ मात्र कुणालाच कळत नसते...

सगळ्या कामांची सुरूवात ती वेळेअगोदरच करते,
पण वेळेचे हे तीचे गणित मात्र अजूनही सारखेच चुकते...

लहान सहान सगळ्याच गोष्टींचे तीला मात्र असते टेंशन फार,
सदानकदा डोक्यात तीच्या चालू असतात शंभर विचार...

अशा अनेक विचारांच्या गोंधळामुळे त्रासलेली दिसते तीची मुद्रा,
जणु सगळ्या धडपडीमध्ये अपूर्ण राहीलेली असते तीची निद्रा...

आहे तशी ती खूप खेळकर खोडकर अशी गुणी ललना,
पण व्यक्त नाही करू शकत ती तीच्या मनातील सा-या भावना...

आनंदात तीला डुबायचे असते, उंच आकाशात उडायचे असते,
पण भीत्रटपणामुळे जणु ती सगळ्याच गोष्टींना मुकते...

विचार सगळ्याचा ती खूप करते, आणि विचारातच हरवून जाते,
अशा अनेक विचारातून मग स्वतःलाच स्वतः ती सावरते...

विनोद ऐकल्यावर मोकळे पणाणे ती खूप खळखळून हसते,
हसताना मग त्या वेळी ती खूपच सुंदर दिसते...

अश्या माझ्या या अल्लड मैत्रीणीच्या चेह-यावर रहावा सदा उल्हासीत हर्ष,
दुःख तीचे सारे दूर पळावे आणि व्हावा फक्त सूखाचाच स्पर्श...

*** लिंगूराम शापित






सुंदर स्वप्नांची झोप...

रात्र झाली अंधार पडला माझ्या अवती भवती,
नाजुक चांदण्यांची शाल पसरली मोकळ्या नभावरती...

आपसूक माझे डोळे मिटून छान झोप मला लागली,
अन् स्वप्ने सूखाची आनंदाची पटकन् मला पडली...

त्या सगळ्या सुंदर स्वप्नांना कवटाळून मी बसलो,
अन् खूप काळानंतर असा मी मोकळेपणाने हसलो..

काळ्याकुट्ट अंधाराची मग संपत आली वाट,
हळूच पहाट पांघरून आली दाट धुक्यांची लाट...

दाटधुक्यांच्या त्या लाटेमध्ये मी वाट हरवून गेलो,
अन् अचानक पलंगावरून मी धपकन् खाली पडलो...

डोळे उघडून पहाता झाली कीलबीलाट पक्षांची,
बघता बघता उडली माझी साखर झोप स्वप्नांची...

*** लिंगूराम शापित

Thursday 20 November 2014

फक्त तिच्याचसाठी ....


योगायोगाचे जीवन माझे, योगायोगानेच सारे घडणे
सरळ मार्ग मुळीच नाही, नुसतीच सारी वळणे...

अशाच एका वळणावरती, ती मला भेटली
दोघांच्याही दुःखाची मग गळा भेट हो घडली...

मी तर खूप दुःखी होतोच, पण तीचीही दुःखे अनंत होती
असे आम्ही समदुःखी, क्षणीक सुखाचे होतो सोबती...

माझ्यातील 'मी' तर कधीच गेला
पण, तीने शोधण्याचा प्रयत्न केला
विचारांना माझ्या दाद तीने दिली
पुन्हा लेखनी घेण्याची ताकद मला आली....

आता विसरून दुःख सारे, घ्यावा सुखाचाच शोध
पण दुःखाशिवाय सुख मिळेना, केल तिने बोध...

तिचे ते म्हणणे रास्तच होते, रास्त तिच्या भावना
अजुनही उंच भरारी घेण्याच्या, खूप तिच्या कल्पना...

शब्द शब्द मग जळवू लागलो, काव्य करण्यासाठी
त्या शब्दांतून काव्य उमटले फक्त तिच्याचसाठी, फक्त तिच्याचसाठी...


*** लिंगूराम शापित

Saturday 6 July 2013

जीवन म्हणजे ??? (दुःख पिऊन आनंद जगणे)


आनंद जीवनाचा कशात असतो ते कळेना,

आणि जे हवे-हवे से वाटते ते कधी मिळेना...



जीवन म्हणजे बुद्धीबळाचा आहे खेळ,
आणि आपण सारे या खेळातले आहोत प्यादी...
आपण मात्र जगतो तोवजीर(निर्माण करता) जगवितो तसे
पण कधीच जुळला नाही त्याचा-आपला जीवनात मेळ....


काळे म्हणजे नर आणि पांढरे म्हणजे मादी
जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करतात ही प्यादी...


कधी वाटते का जगावे असले हे जगणे
पण कधीही कळले नाही त्या निर्मात्याचे वागणे...


कधी कधी आयुष्यात जगणे एकदमच कठीण होऊन जाते
जेव्हा जीवनात एकदम अचानक काही अघटीत घडते...


जसे घडले माझ्याबरोबर तसे तुझ्याबरोबरही काही घडले असेल,
मग करुया ना सगळे एकमेकांशी शेअर, म्हणजे काही मार्ग दिसेल..


का जगावे असे रडत-कुढत आणि गाळावे उगाच आसू
तू आणि मी कधीतरी फुल टट्टू होईपर्यंत पीत बसू...


क्षणभर का होईना, विसरून जाऊ हे सारे जग
आणि एकच प्याल्या बरोबर मारून एक झुरका बघ...


तू तूझ्या पद्धतीने मिळव सारा तूझा आनंद
मी माझ्या पद्धतीने मिळविण माझा आनंद...


मग का जगावे जगणे फक्त गाळीत आसू
तू आणि मी फूल टट्टू होईपर्यंत पीत बसू....

                                                                                                                 *** लिंगूराम शापित


Tuesday 19 April 2011

कुणीतरी कुठेतरी......................

ऐलतीरी वा पैलतीरी,  जीवनाच्या या वाटेवरी
असेल काहो माझ्यासाठी, कुणीतरी कुठेतरी ...

काळा तिळ ओठावरी, कांती तीची गोरी गोरी
असेल काहो ती माझ्या, स्वप्नातली जणू परी...

गाल तिचे लाल लाल, हरणीसारखी तीची चाल
काळ्याभोर केसांमध्ये, गुलाबाचे फुल छान.....

कोकीळेचा कंठ तीचा, सरस्वती वसे तीच्या वाणी
नाजूकश्या त्या कोमल हातांनी पाजेल का हो मला ती पाणी...

प्रेमळ वात्सल्याची मुर्ती, दूरवर असे जीची किर्ती
भेटेल का कधीतरी अशी कुणी करण्या माझ्या स्वप्नांची पूर्ती...

प्रेमाचा वर्षाव सदा माझ्यावर करण्या
वेडा जीव माझ्यावरच लावण्या
भेटेल का हो अशी वेडी कुणी
जी बसेल माझ्या या वेड्या मनी...


ऐलतीरी वा पैलतीरी,  जीवनाच्या या वाटेवरी
असेल काहो माझ्यासाठी, कुणीतरी कुठेतरी ...

*** लिंगूराम शापित


Thursday 7 April 2011

पण उपेक्षीतच राहीलो..........


मनातले काही भाव येथे मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न -


दाट धुक्यातून कसाबसा मी वाट काढीत चाललो
काय शोधू पाहे हे मन कळेणा अण् पुन्हा पुन्हा हरवलो

जीवन मरणाच्या या गाड्यात पुरता अडकू मी गेलो
कधी सुटणार हे पाश दुःखांचे खूप कासाविस मी झालो

वाट पाहून थकलो तरी नाही आले मरण
का जगतोस असे म्हणते माझे मन, आता पुरे झाले हे जीवन


नाही कोणी माझे येथे, जगणे एकटेच जगलो
       केली प्रेमाची अपेक्षा, पण उपेक्षीतच राहीलो...............


*** लिंगूराम शापित