Thursday 20 November 2014

फक्त तिच्याचसाठी ....


योगायोगाचे जीवन माझे, योगायोगानेच सारे घडणे
सरळ मार्ग मुळीच नाही, नुसतीच सारी वळणे...

अशाच एका वळणावरती, ती मला भेटली
दोघांच्याही दुःखाची मग गळा भेट हो घडली...

मी तर खूप दुःखी होतोच, पण तीचीही दुःखे अनंत होती
असे आम्ही समदुःखी, क्षणीक सुखाचे होतो सोबती...

माझ्यातील 'मी' तर कधीच गेला
पण, तीने शोधण्याचा प्रयत्न केला
विचारांना माझ्या दाद तीने दिली
पुन्हा लेखनी घेण्याची ताकद मला आली....

आता विसरून दुःख सारे, घ्यावा सुखाचाच शोध
पण दुःखाशिवाय सुख मिळेना, केल तिने बोध...

तिचे ते म्हणणे रास्तच होते, रास्त तिच्या भावना
अजुनही उंच भरारी घेण्याच्या, खूप तिच्या कल्पना...

शब्द शब्द मग जळवू लागलो, काव्य करण्यासाठी
त्या शब्दांतून काव्य उमटले फक्त तिच्याचसाठी, फक्त तिच्याचसाठी...


*** लिंगूराम शापित

No comments:

Post a Comment