Sunday 12 July 2015

मी एक एकटा ....

आकाशात सूर्य तळपतो एकटा
नभी फिरतसे चंद्र एकटा
ही अवनीही असे एकटी
तीवर जन्मा आलो मी एकटा
मी एक एकटा.... मी एक एकटा...

नाही मिळाले सुख कधीही
ना प्रेमाची मीळाली वाणी
येता डोळ्या मध्ये पाणी
पुसायला नाही कोणी
एकांत शोधण्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

ना मिळाले प्रेम कुणाचे 
ना लावला जीव कुणी
सदैव दुर्लक्षितच राहिलो
असूनही मी इतका गुणी
प्रेम शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

वाटा अडचणींच्या होत्या
परि मार्ग कधी ना मिळाला
पण प्रयत्न करताना तरीही
पडलो, हरलो....
मी एक एकटा.... मी एक एकटा...

हसतो निखळ आनंदाने
तरी जीव दुःखाने जळत असतो
वेडे मन कुणाचे नाही भेटले
जाणून घेण्या दुःख जीवाचे
अश्या वेड्या मना शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

घास वात्सल्याचा प्रेमाणे भरवावा
हात केसातूनी माझ्या फीरवावा
पण या शापित जीवाला कधीही
नाही लाभले असे जीवन सुखी
अश्या जीवा शोधन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

संसार सुखाचा करण्यासाठी
डाव स्वप्नांचा मांडला मांडला मी
अन् डाव मोडला अर्ध्यावरती
राख झाली सा-या स्वप्नांची
पुन्हा स्वप्ने पाहन्या निघालो
मी एक एकटा.... मी एक एकटा...

तेव्हा ही मी एकटाच होतो
आताही एकटाच मी
उद्याही मी एकटाच राहिन
जातानाही असेन एकटाच मी...

मला अजूनही कळत नाही
माझे काय चुकले आणि काय चुकते आहे
शोधन्या ती चुक निघालो....
मी एक एकटा.... मी एक एकटा... 


*** लिंगूराम शापित 

No comments:

Post a Comment