Saturday 22 November 2014

सुंदर स्वप्नांची झोप...

रात्र झाली अंधार पडला माझ्या अवती भवती,
नाजुक चांदण्यांची शाल पसरली मोकळ्या नभावरती...

आपसूक माझे डोळे मिटून छान झोप मला लागली,
अन् स्वप्ने सूखाची आनंदाची पटकन् मला पडली...

त्या सगळ्या सुंदर स्वप्नांना कवटाळून मी बसलो,
अन् खूप काळानंतर असा मी मोकळेपणाने हसलो..

काळ्याकुट्ट अंधाराची मग संपत आली वाट,
हळूच पहाट पांघरून आली दाट धुक्यांची लाट...

दाटधुक्यांच्या त्या लाटेमध्ये मी वाट हरवून गेलो,
अन् अचानक पलंगावरून मी धपकन् खाली पडलो...

डोळे उघडून पहाता झाली कीलबीलाट पक्षांची,
बघता बघता उडली माझी साखर झोप स्वप्नांची...

*** लिंगूराम शापित

No comments:

Post a Comment