Tuesday, 22 March 2011

तुम्हाला काय वाटते ?


जीवन जगत असताना फार वेगवेगळे अनुभव सर्वांना येतात. कुणी त्यातुन काही शिकतो तर कुणी ..........

मलाही असे अनुभव फार आले आणि त्यातून माझी वागण्याची लयच बदलून गेली. मी माझ्या मनावर ताबा (पूर्ण नाही) मिळवला आणि मनाला व मला या अनुभवांतुन मनाला जे पटते त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न सुरु केला.

असे जगत असताना आपण जे वागतो ते इतरांना आवडत नाही - त्यांना रुचत नाही , बरोबर आहे असे वाटते पण बरोबर असे बोलण्याची हिंमत होत नाही.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला विचारायच्या आहेत. अशा प्रसंगाची कल्पना करुन  सांगा तुम्हाला काय वाटते ?

प्रसंग १ : अनेकदा असे होते की प्रत्येकाच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते की जर माझ्या तोंडावर कुणी माझ्याबद्दल काही बोलले तर चालेल म्हणजे आपल्या काही वाईट गोष्टींहद्दल, मग मला एवढा राग आला नसता पण माझ्या मागे बोलले जाते याची मला फार चिड येते..........

पण खरोखरच असे जर कोणाच्या तोंडावर आपण जर त्याच्या वाईट गुणांविषयी आपल्याला कीतीही वाटले तरी बोललो तर परीणाम काय होतील ? विचार करा आणि सांगा तुम्हाला काय वाटते ?????????


प्रसंग २ : स्वतःला देवाचा भक्त किंवा देव देव करणारे, देवाची भजने, उपास-तापास करणारे अनेक आपण पाहातो. देवळात जाउन देवाच्या गाभा-याबाहेर असलेल्या दानपेटीत दान टाकून स्वतःला धन्य माननारे आपण पाहातो. पण अश्या सगळ्यांना पाहून मला वाटते की हे सारे खरे आहे का ? त्यांच्या मनात खरोखरच देवाची भक्ती आहे का ? का हा फक्त वरवरचा देखावा. कारण जो देवाची मनोभावे पूजा करून, दान दक्षीणा देऊन देवळाबाहेर येतो तोच देवळाच्या बाहेर एखादा भिकारी दिसला तर त्याला शिव्या देवून हाकलवून देतो(यात काही अपवादही आहेत) .

किंवा स्वतःला काही पूण्य लाभावे म्हणून कबूतरांना रोज चिक्कार दाणे घालणारे आपण पाहतो. पण खरचं त्या कबूतरांना वाया जाईपर्यंत दाणे घालणे गरजेचं आहे का ?

कित्येकजण पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ दिवाबत्ती करतात. अगदी झाडाच्या मुळाजवळ खड्डा करून त्यात कापूर वगैरे जाळतात. कित्येकजण तर झाडाच्या मधल्या ढोलीतच बत्ती लावतात. का तर ह्यांना कोणीतरी सांगीतलेल असतं की पिंपळाची पुजा केल्यावर चांगलं घडेल . म्हणून पिंपळाच्या मुळात बत्ती लावून त्या झाडाला त्रास दिला जतो याबद्दल तुम्हाला काय वाटते ??????


प्रसंग ३ : पैसा ही अशी गोष्ट आहे की ती ज्याला हवी असेल तो तुमच्याशी तुमच्याकडून मिळविण्यासाठी फार गोड बोलेल, तुम्ही सांगाल ते करेल. पण जेंव्हा ते परत देण्याची वेळ येईल तेंव्हा तुम्हाला तो टाळेल, क्वचीत प्रसंगी भांडायलाही लागेल. मनुष्याची  ही प्रवृत्ती फार चुकीची आहे , तुम्हाला काय वाटते ???????????







No comments:

Post a Comment