Saturday 22 November 2014

माझी मैत्रीण...

एक माझी मैत्रीण आहे साधी भोळी अल्लड,
रोज तीची होत असते काही न काही गडबड...

धावपळ खटपट दगदग तीची सारखीच चालू असते,
तिच्या मनाची तळमळ मात्र कुणालाच कळत नसते...

सगळ्या कामांची सुरूवात ती वेळेअगोदरच करते,
पण वेळेचे हे तीचे गणित मात्र अजूनही सारखेच चुकते...

लहान सहान सगळ्याच गोष्टींचे तीला मात्र असते टेंशन फार,
सदानकदा डोक्यात तीच्या चालू असतात शंभर विचार...

अशा अनेक विचारांच्या गोंधळामुळे त्रासलेली दिसते तीची मुद्रा,
जणु सगळ्या धडपडीमध्ये अपूर्ण राहीलेली असते तीची निद्रा...

आहे तशी ती खूप खेळकर खोडकर अशी गुणी ललना,
पण व्यक्त नाही करू शकत ती तीच्या मनातील सा-या भावना...

आनंदात तीला डुबायचे असते, उंच आकाशात उडायचे असते,
पण भीत्रटपणामुळे जणु ती सगळ्याच गोष्टींना मुकते...

विचार सगळ्याचा ती खूप करते, आणि विचारातच हरवून जाते,
अशा अनेक विचारातून मग स्वतःलाच स्वतः ती सावरते...

विनोद ऐकल्यावर मोकळे पणाणे ती खूप खळखळून हसते,
हसताना मग त्या वेळी ती खूपच सुंदर दिसते...

अश्या माझ्या या अल्लड मैत्रीणीच्या चेह-यावर रहावा सदा उल्हासीत हर्ष,
दुःख तीचे सारे दूर पळावे आणि व्हावा फक्त सूखाचाच स्पर्श...

*** लिंगूराम शापित






No comments:

Post a Comment